माझ्याविषयी थोडे काहितरी…

सर्वप्रथम इथे आल्याबद्दल अगदी मनापासुन धन्यवाद!

हे माझे घर आहे असे मी समजते आणि माझ्या ह्या घराला भेट दिल्याबद्दल आभार.

मनात येणारे विचार, आजुबाजुला घडत असलेल्या घटना, आलेले अनुभव हे सगळे लिहुन ठेवावे का हा विचार कित्येक वर्षे मनात येतोय आणि परत मागे पडतोय. कधीतरी हातुन काहितरी लिखाण होतेही, वाचणारे माझे मित्रच असल्याने लगेच ‘अगं, लिही ना अजुन’ चा आग्रहही होतो. पण लिहिले जात नाही. अर्थात लिहिले असते तरी मी काही उच्च दर्जाचे लिहू शकले असते असे काही नाही. तेवढी प्रतिभा माझ्याकडे नाहीय. अनुभवांविषयी बोलायचे तर एका सामान्य माणसाच्या सामान्य आयुष्यात असामान्य काय आणि किती घडणार?

मग तरीही आता का लिहितेय? तर यासाठी की पुढे जाऊन परत मागे वळून पाहिन तेव्हा ते वाचुन कदाचित हसेन, कदाचित चुटपुटेन. २५ वर्षांपुर्वी माझे जे समज होते ते आता आठवले की मला हसायला येते. किती मुर्ख होतो आपण असे वाटते… 🙂 आज जे वाटतेय, अजुन १० वर्षांनी ते वाचुन हसायला मला खुप आवडेल. आज जे वाटतेय त्यातले १० वर्षांनंतर किती टिकेल हे पाहायलाही आवडेल आणि त्यासाठीच हा खटाटोप. खुप वेळ वाया गेलाय. उरलेला तरी काहितरी कारणी लावाला……..

तुम्ही इथे आलात याचा मला आनंद आहे. काही आवडले तर आनंद द्विगुणीत होईल. आवडले म्हणुन सांगितले नाहीत तरी चालेल, मात्र नावडले तर नक्की सांगा. का नावडले याचा विचार करायला मलाही आवडेल.

(हे अ-अनुदिनी काय प्रकार आहे असे वाटले असेल ना? अ-नियतकालिक जसे संपादकाला जाग येते तेव्हाच प्रकाशित होते, तशी माझीही अनुदिनी, मला जेव्हा जाग येते तेव्हाच अपडेट होते. 🙂

धन्यवाद.

आपली,
साधना.

Advertisements

5 thoughts on “माझ्याविषयी थोडे काहितरी…

  1. इतर व्यावसायिक माहिती
    शेतकीविषयक विषयांमध्ये रस आहे. फुड प्रोसेसिंग युनिट सुरू करायचे आहे. >> म्हणजे नेमकं काय करणार आहात? प्रक्रिया उद्योगा बद्दल मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.आम्ही स्वत:शेती करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s